विजयादशमी निमित्त नगरमध्ये मनुस्मृतीचे दहन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विजयादशमी निमित्त रावण दहनाला फाटा देत अरणगाव रोड येथील इंदिरानगर येथे विद्रोही विचार मंचच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. 


यावेळी विद्रोही विचार मंचचे जालिंदर चोभे पाटील, डॉ.श्याम गायकवाड, सुधाकर गायकवाड, परशराम रणसिंग, राहुल जाधव, सचिन पाचरणे, विशाल धोत्रे, अमोल कदम, प्रशांत मिरपगार, अमोल मिरपगार, सनी गायकवाड, अक्षय गायकवाड, जॅक्सन फर्नांडिस, किरण गायकवाड आदींसह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Loading...

विजयादशमीला रावण दहन करण्याची प्रथा चुकीची असून, रावण गुणसंपन्न होता. रामायणामध्ये 18 पुराणांमध्ये आणि राजा बोधिसत्वाच्या नुसार रावण महापंडित, महाशिवभक्त, शूरवीर, नैतिक मुल्याची जपवणूक करणारा राजा असल्याचा उल्लेख आहे. सीतेच्या अपहरणानंतर रावणाने आणि तिच्या पत्नीने सीतेला सन्मान दिला. 

विजयादशमीला दुर्गुणांचे दहन केले पाहिजे. मनुस्मृतीत मानवी मुल्यांचा विचार केला गेलेला नाही. तर बहुजनांवर अन्यायाचे मुळ कारण मनुस्मृती ठरली आहे. रावणदहन प्रथा बंद पाडण्यासाठी व बहुजनांवर अन्यायासाठी मुळ कारण ठरलेल्या मनुस्मृतीचे दसर्‍याच्या दिवशी दहन करीत असल्याचे विद्रोही विचार मंचच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.