आता भाजपशी युती नाही :अनिल राठोड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मनपा निवडणुकीसाठी बहुतेक प्रभागांमध्ये शिवसेनेचे चारजणांचे पॅनेल होत असून इच्छुकांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे युतीची वेळ आता टळली आहे. ऐनवेळी युती झालीच, तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे, असे माजी आमदार अनिल राठोड यांनी शुक्रवारी सांगितले. वरिष्ठांनी युतीबाबत घेतलेला निर्णय देखील मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 
Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (२१ ऑक्टोबर) नगर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राठोड बोलत होते. यावेळी घनश्याम शेलार, शहरप्रमुख दिलीप सातपुते उपस्थित होते. राठोड म्हणाले, ठाकरेंची शिर्डीत सकाळी अकरा वाजता सभा होईल. 

रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या मैदानावर दुपारी एक वाजता मेळावा आहे. मनपा निवडणुकीत युतीसाठी भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. वरिष्ठ जो आदेश देतील, त्याची अंमलबजावणी केली जाईल. सर्व प्रभाग हाऊसफुल्ल असून चार किंवा त्यापेक्षा जास्त इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत युती झाली, तर कोणत्या दोघांना थांबायला सांगायचे ? युतीचा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते, आता वेळ टळली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.