मोनिका राजळे यांची राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी लागणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा पाथर्डी तालुक्यामध्ये सुरू झाल्याने राजळे समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप -शिवसेना युती असलेल्या राज्य सरकारचा दि. २३ आक्टोबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यामध्ये नगर जिल्ह्यातून पाथर्डी -शेवगावच्या आ. मोनिका राजळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
Loading...

चार दिवसांपूर्वीच लोकनेते राजीव राजळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी आ. शिवाजीराव कर्डिले म्हणाले होते, की मोनिकाताईंनी मतदारसंघात भरीव विकास निधी आणला, त्यांना लवकरच मंत्रिमंडळात काम करण्याची मिळेल, राजळेताई मंत्री झाल्यास नगर जिल्ह्याला पलकमंत्री राम शिंदे व राजळे यांच्या रुपाने दोन मंत्री लाभतील, त्यामुळे आता पुन्हा एकदा होणाऱ्या मंत्रिमंडळात मोनिकाताईंची वर्णी लागून आ. कर्डिलेंचा शब्द खरा ठरतो, की काय याची उत्सुकता आता पाथर्डीकरांना लागली आहे. 


काही दिवसांपूर्वीच चाणक्याने जाहीर केलेल्या अहवालानुसार आ. मोनिका राजळे नगर जिल्ह्यात टॉपवर असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि राजीव राजळे वर्गमित्र होते. त्याचबरोबर ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आणि मोनिकाताई मानलेल्या भगिनी. पालकमंत्री शिंदे यांनीदेखील पाथर्डी व शेवगावला झुकते माप दिले आहे, त्यामुळे उत्सुकता वाढली असून, कार्यकत्यांर्नी अपेक्षा करणे काही गैर नाही.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------

Powered by Blogger.