विवाहबाह्य संबंध असल्याने नातेवाईकांकडून मारण्याचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर मधील एका तरूणीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याच्या रागातून तिच्या नातेवाईकांनी सदर तरूणीचे अपहरण करून प्रचंड मारहाण केली.तसेच तिला बेशुध्द स्थितीत राहुरी जवळ वांबोरी घाटात फेकून दिले.


Loading...
मात्र एमआयडीसी पोलीसांच्या सतर्कतेमुळे सदर तरूणीचे प्राण वाचले असून पिडीत तरूणीच्या जबाबानुसार श्रीरामपूर पोलीसांनी 4 लोकांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून तीन जणांना तातडीने अटक देखील केली आहे. 

मुनावर सरदार शेख,गनी कासम सैय्यद,काजू हसन सय्यद व अरबाज शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे पिडीत तरूणीच्या जवळचे नातेवाईक आहेत. श्रीरामपूर मधील तरूणीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याच्या रागातून आरोपींनी तरूणीचे श्रीरामपूर मधून अपहरण केले.


आरोपींनी तिला प्रचंड मारहाण केली.तसेच ओढणीने तिचा गळा आवळून जबरदस्तीने तिला एक औषध पाजले.तरूणी बेशुध्द झाल्यानंतर तिचा मृत्यु झाला असे समजून तिला एका गाडीत घालून राहुरीजवळ असलेल्या वांबोरी घाटात आणून रात्रीच्या अंधारात घाटातील खोल दरीमध्ये फेकून दिले.


दुस-या दिवशी रस्त्याने जाणा-या ग्रामस्थांनी बेशुध्द स्थितीत असलेल्या तरूणीला पाहिल्यानंतर एमआयडीसी पोलीसांना माहिती दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आपल्या सहकारी कर्मचार्यांना बरोबर घेऊन वांबोरी घाटात जाऊन जखमी स्थितीत असलेल्या तरूणीला बाहेर काढले.


पोलीसांनी तरूणीला अहमदनगरच्या जिल्हा सरकारी रूग्णालयात दाखल केले.पिडीत युवती शुध्दीवर आल्यानंतर तिने दिलेल्या जबाबानुसार एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल करून तो श्रीरामपूर पोलीसांकडे वर्ग केले.श्रीरामपूर पोलीसांनी देखील तातडीने कारवाई करीत 3 आरोपींना गजाआड केले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.