पंतप्रधान मोदींना दाखविणार काळे झेंडे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी येथे दि. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी साईबाबांच्या शताब्दी सोहळा समाप्ती कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून देशातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व हमीभावाच्या प्रश्नावर विश्वासघात केल्यामुळे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे व किसन काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
Loading...

जवरे म्हणाले, केंद्रात सत्तेत आलेले भाजप सरकारने सन २०१४ च्या लोकसभा निवडणूका दरम्यान जाहीरनामा प्रसिद्ध करून संपूर्ण शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करू अशा प्रकारची कर्जमाफी करून डॉ.एम.एस. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करू शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव व त्यावर ५० टक्के नफा देऊ, असे आश्वासन दिले होते. सर्वोच्च न्यायालयात केंद्रातील भाजप सरकारने बाजू मांडताना शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावरील भाव व त्यावर ५० टक्के नफा आणि शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करता येणार नाही. त्यामुळे देशाच्या बाजारपेठेत असंतुलन येईल अशा प्रकारे सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. 


सन २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशात शेती विषयक चुकीचे धोरण घेतल्याने व शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागास व दुबळा होत चालला असून कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे साईबाबांच्या पावनभूमीत काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे व किसन काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.