सासरच्यांकडून छळ कोपरगावात विषारी औषध घेऊन विवाहितेची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शेती घेण्यासाठी माहेरून सहा लाख रुपये आणावेत, म्हणून सोनाली मच्छिंद्र शिंदे (वय १९, कोकमठाण) हिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यास पती, दीर, सासू व सासरे जबाबदार असल्याची तक्रार विवाहितेच्या आईने दिल्याने खळबळ उडाली आहे. 

Loading...
सोनालीचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला. सारखे टोचून बोलणे, माहेरच्यांचा अपमान करणे असे करत पती मच्छिंद्र, दीर दत्तू, सासू कडूबाई व सासरा अहिलाजी यांनी शेती घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, तरच या घरात राहा असे म्हणून तिचा छळ केला. 

हा सर्व त्रास असह्य होऊन तिने ८ ऑक्टोबरला रात्री विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी सोनालीची आई अलका बाळासाहेब पवार हिने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.