मंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना आणखी चांगलं खातं मिळेल. या गावची जगदंबा देवी ही नवसाला पावणारी देवी असून, आपण सर्व मिळून नवस करू आणि आणखी मोठं खात मिळून शिंदे यांची ताकद वाढेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कर्जत ते खेड रस्ता कामाच्या शुभारंभ ना. पाटील यांच्या हस्ते राशीन येथे झाला, या वेळी ते बोलत होते.
Loading...
 
अध्यक्षस्थानी जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे होते. ना. पाटील पुढे म्हणाले, या राज्यात १० हजार किलोमीटरचे रस्ते हायब्रीड अन्युटी योजनेतून होणार असून, त्यातील पहिला रस्ता अमरापूर ते भिगवण हद्दीपर्यंत होत आहे. या योजनेतून कमी पैशात जास्त रस्ते होणार असून, दहा वर्षे रस्त्याची जबाबदारी ठेकेदारांवर राहणार आहे. तीन, पाच व सात वर्षांनी पुन्हा ठेकेदारांकडून ते रस्ते नवीन करून घेतले जाणार असून, या सिमेंट रस्त्यांना दहा वर्षे ते १२ वर्षे खड्डा पडणार नाही, एकूण रस्त्यापैकी पन्नास टक्के रस्ते अशाच प्रकारे होणार असून, दोन वर्षात हे सर्व रस्ते पूर्ण होणार आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.