सोनईत कापड दुकानावर आयकर विभागाचा छापा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालूक्यातील सोनई व्यापारी पेठेतील एक मोठ्या कापड दुकानावर सोमवारी (दि. १५) सकाळी आयकर विभागाचा छापा पडल्याची माहिती मिळालेली असून सोनईत साडी, सुटींग, शर्टींग, रेडीमेड, होजिअरी कापड विक्रीचे हे मोठे दुकान आहे. सोमवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकल्याची माहिती व्यापारी पेठेत समजली. 
Loading...

कुणालाही काहीही खात्रीशी माहिती नव्हती. अगोदर प्लास्टीक पिशव्यांवर छापा चर्चा, जीएसटीबाबत छापा अशा वेगवेगळ्या अफवा पसरल्या; मात्र आलेले अधिकारी आयकर विभागाचे असल्याची माहिती मिळाली असून सोमवार सायंकाळपर्यंत कापड दुकान, स्टॉक, विक्री बिले, कामगार याबाबत हे पथक माहिती घेत होते, असे समजले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.