सुजित झावरे पाटील पुन्हा सक्रीय !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुजित झावरे पाटील पुन्हा सक्रीय झाले आहेत पारनेर तालुका दुष्काळी म्हणून घोषित करावा, अशी मागणी जि. प. चे. माज़ी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केली आहे. झावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कष्टकरी, जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी पारनेर तालुक्याच्या वतीने तहसीलदार गणेश मरकड व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 
Loading...

या वेळी पारनेर तालुका दुष्काळी घोषित करावा, तालुक्यातील टॅंकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत, तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी चाराडेपो चालू करण्यात यावेत, वीज़पुरवठा सुरळीत करण्यात यावा,पिंपळगाव जोगे, पिंपळगाव खांड, कुकडी या तिन्ही कालव्यांद्वारे पारनेर तालुक्यात पाणी सोडण्यात यावे, कुकडी तसेच पिंपळगाव जोगा कालव्याचे पाण्याचे आवर्तन दि. १० नोव्हेंबरऐवजी २५ ऑक्टोबर रोजी सोडावे, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. 

या वेळी दादासाहेब पठारे, अरुणराव ठाणगे, सुधामती कवाद, गंगाराम बेलकर, सोन्याबापू भापकर, दीपक नाईक, योगेश मते, विजय पवार, सुभाष लोंढे, किसनराव रासकर, योगेश रोकडे, मोहन रोकडे, संतोष शितोळे,स्वप्निल राहिंज, दादा शेठे, चंद्रकांत कुलकर्णी, साहेबराव नरसाळे, मार्तंडराव रासकर, संदीप औटी, महेंद्र मगर, तुळशीराम गायकवाड, बाळासाहेब रेपाळे, अर्जुनराव गुंड, शरद गुंड तसेच तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.