भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीससह १४ जण हद्दपार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्यासह १४ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. प्रकाश चित्ते यांच्यासह १४ जणांवर नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सी.आर.पी.सी. कलम १४४(२) नुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 
Loading...

चित्ते यांच्यासह अल्तमश पेंटर युनूस शेख (रा. वॉर्ड क्र. २), मयूर विष्णू जाधव (रा. वॉर्ड न. ७), विकास ऊर्फ सनी भानुदास गोरे (रा. गायकवाड वस्ती), विजय ऊर्फ विजू बबन चव्हाण (रा. डावखर रोड), शरीफ लतीफ शेख (रा.वॉर्ड नं. १), सर्फराज शेरखान पठाण (रा. वॉर्ड नं. १), संतोष एकनाथ वायकर (रा. बोंबले वस्ती, वॉर्ड नं. ७), पक्या ऊर्फ प्रदीप लालचंद काळे (रा. अशोकनगर, हरेगाव फाटा), दत्तात्रय जगन्नाथ जाधव (रा. शिरसगाव), प्रकाश शिवाजी रन्नवरे (रा. वॉर्ड नं. १), सुरेश योहान उबाळे (रा. रासकरनगर, वॉर्ड नं. ७), सचिन ऊर्फ गुड्डू कृष्णा वायकर, रावजी ऊर्फ बिट्टू कृष्णा वायकर (दोघे रा. कांदा मार्केट परिसर, वॉर्ड नं. ६) यांचा समावेश आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.