खर्‍याची दुनिया नाही राहिली हे आज कळाल ...


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : काही चूक नसतांना मुलीस चिठ्ठी दिल्याचा आरोप केल्याने आणि त्यानंतर झालेली मारहाण यामुळे अपमान झाल्याचे समजत राहुरी तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणाने मुळा धरणात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मनोज याच्या पश्‍चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी, मनोज शिवाजी ससाणे (वय२३ रा. दत्तनगर, राहुरी फॅक्टरी परिसर राहुरी)हा जनरल स्टोअरमध्ये काम करीत असतांना सोमवारी दुपारी काही तरुण दुकानात आले आणि अचानकपणे मनोजवर एका मुलीस चिठ्ठी दिल्याचा आरोप करीत त्याला मारहाण केली त्या मारहाणीमुळे मनोज व्यतीत झाला. 

आपली काही एक चूक नसतांना झालेल्या मारहाणीच्या प्रकाराने त्याला अपमान जिव्हारी लागला.त्यामुळे तो दुचाकीवरून थेट मुळा धरणावर गेला. तेथे जाऊन त्याने व्हॉट्सअॅप स्टेटसवर खर्याची दुनिया नाही राहिली हे आज कळाल असा संदेश लिहित आपण आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली. अन धरणात उडी मारून आत्महत्या केली. 

त्याच्या मित्रांनी पोस्ट पाहून मुळा धरणावर जाऊन पाहिले असता तेथे दुचाकी मिळून आली. तेथील काही तरुणाच्या मदतीने त्याचा पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला.

आरोप सहन न झाल्याने संपवली जीवन यात्रा !  
मनोज हा गरीब घरातील होता. नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही म्हणून तो जनरल स्टोअरमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो अत्यंत सालस, मनमिळाऊ असल्याने त्याच्यावर झालेले आरोप व मारहाण सहन झाली नाही म्हणून मनोज याने जीवन यात्रा संपवली. मनोज यास मारहाण करणार्‍यां विरुध्द गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी मनोजच्या मित्रांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.