नितीन उदमलेंच्या भाजप प्रवेशाने माजी खासदार वाकचौरेना धास्ती.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिणेप्रमाणेच उत्तरेतही लोकसभेचे मोसमी वारे आता जोर धरू लागलेय.राज्य स्तरावर युती होणार कि स्वतंत्र लढणार अशी चर्चा रंगत असतानाच प्रत्येक पक्षातील इच्छुक आपल्या पद्धतींनी तयारी करत आहेत. आणि स्वतःच उमेदवार असू अशी खात्री देत आहेत.
Loading...

शिर्डी ची जागा शिवसेनेला असूनही तिथे सेनेकडून इच्छुक असणाऱ्या पेक्षा भाजपातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा जनतेशी असणारा संपर्क आणि विद्यमान खासदाराची निष्क्रियता या मुळे वाकचौरेंना उमेदवारीची अडचण नव्हती मात्र अचानक भाजपने माजी सनदी अधिकारी नितीन उदमले यांचा थेट दिल्लीत प्रवेश करून त्यांना सक्रिय केल्यामुळे वेग वेगळ्या चर्चा घडत आहेत.

अचानक उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाल्याने वाकचौरेही सावध पावले टाकत आहेत.मात्र संघर्ष टाळत उदमलेना लोकसभा आणि वाकचौरेंना श्रीरामपूर विधानसभा लढवण्या बाबत वरिष्ठ पातळीवरून सुचवले जाईल असे समजते. या मध्ये वयाचा मुद्दा पुढे केला जात असून श्रीरामपूर मध्ये ऐनवेळेस उमेदवारी करूनही वाकचौरेंनी मिळवलेली मते गृहीत धरून हा निर्णय घेतला जात आहे.

माजी खा.वाकचौरे या जागेसाठी भाजपकडून इच्छुक असुनही विरोधीपक्षनेते विखे पाटील यांच्याशी त्यांचे असलेले संबध आणि पक्षबदल त्यांना चागलाच भोवण्याची शक्यता आहे. याचाच फायदा माजी सनदी अधिकारी नितीन उदमले यांना होणार असून वाकचौरेंना पर्याय म्हणून उदमले यांचा पक्षप्रवेश आवर्जून करवून घेतला असल्याचे सांगण्यात येते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.