राहुरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मनसेत ? 'तनपुरे' गटात खळबळ !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब राधुजी पा. तनपुरे उर्फ आर. आर. तनपुरे यांनी मनसेत प्रवेश करत पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात चर्चा केल्याने राहुरीच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे.

Loading...

आर. आर. तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे खंदे समर्थक समजले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे राहुरीत जनसेवा मंडळाला मोठे खिंडार पाडणार आहे.आर.आर. तनपुरे यांचा मनसे प्रवेशाने जनसेवा मंडळाला घरचाच आहेर मिळाला असून युवा नेते प्राजक्त तनपुरे हे राहुरीतून राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांना मनसेचे आर.आर तनपुरेंची डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.