दारूच्या नशेत अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील कोतुळ येथे गळफास घेऊन एका अविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना  घडली.काशिनाथ ऊर्फ राजू भीमा कचरे (वय 27) असे या तरुणाचे नाव असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केले असल्याचे समजते. घरी एकटाच असताना घरातील ॲगलला साडीच्याच साहाय्याने गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, येथील आदर्श नगर भागात राजू भीमा कचरे (वय 27) राहत होता. दारूचे व्यसन नसल्याने तो आई-वडिलांना मारहाण करायचा यामुळे आई आणि वडील दोघेही नातेवाईककडे होते. घरी कोणी नसताना काशिनाथ यांने साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. तीन-चार दिवसांपासून घराचा दरवाजा बंद होता. घराभोवती माशा घोंगावत असल्याचे आसपासच्या लोकांच्या लक्षात आले. 

नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली.त्यानंतर दरवाजा तोडला असता काशिनाथ लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह चार ते पाच दिवस लटकलेल्या अवस्थेत राहिल्याने मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यू नुसार नोंद केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.