राहता तालुक्यात चाळीस कुत्रे मृतावस्थेत आढळल्याने ग्रामस्थांत संताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहता तालुक्यातील आडगाव शिवारात सुमारे 40 पेक्षा अधिक कुत्रे रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे.कोणीतरी कुत्र्यांना पकडून त्यांना मारून टाकले व या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारात आणून टाकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Loading...
आडगाव येथून गोगलगावला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला हे कुत्रे मृतावस्थेत पडले असल्याचे नागरिकांनी पहाताच हवेसारखी वार्ता गावात पसरली, नागरिकांनी या वेळी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.एकाचवेळी मोठ्या संख्येने कुत्रे मृतावस्थेत पाहून हळहळ व्यक्त करत तिर्व संताप व्यक्त केला. मुक्या प्राण्याचा अशाप्रकारे बळी घेऊन त्यास ग्रामीण भागात आणून टाकल्याने तिर्व शब्दात ग्रामस्थांनी चीड व्यक्त केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.