वसंतटेकडी जलकुंभाजवळच पाणी गळती परिसरातील घरात घुसले पाणी, डेंग्युने बालक त्रस्त !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  प्रभाग क्र.2 मधील वसंतटेकडी जलकुंभाजवळच गेल्या 20 दिवसांपासून पाणी गळती होत असून या परिसरातील घरात पाणी घुसले तर मोकळ्या जागेत पाण्याचे तळे साचल्याने साथीच्या आजारात वाढ झाली महानगर पालिकेकडून कोणत्याच प्रकारची उपाययोजना होत नसल्याने नागरीकांनी नगरसेवक महेश तवले यांच्याकडे तक्रार केली. 


Loading...
या तक्रारीची तातडीने दखल घेत नगरसेवक तवलेंकडून पाहणीकरुन पाणीपुरवठा विभाग व दुरुस्ती विभागाच्या अभियंत्यांना सुचना केल्या. गेल्या 20 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने जलकुंभाजवळ असलेल्या रहिवासीयांना पिण्याचे पाणी कमी मिळते. 

साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. साथीच्या आजाराने थैमान घातले असून सुलोचना शिंदे ह्या आजारी असून 3 वर्षाचा अर्नव अभिजित कुलकर्णी हा डेंग्यूने त्रस्त होता त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटूंबातील आई-वडीलांनी सांगितले. 

साचलेल्या पाण्यावर फवारणी होणे आवश्यक आहे. मुळात हि गळती बंद करावी अशी मागणी येथील रहिवासी सुरेश देशमुख, अर्जुन शिंदे, कुलकर्णी परिवाराने केली आहे. नगरसेवक महेश तवले यांनी इंजिनिअर काकडे यांचेशी संपर्क साधून तातडीने दखल घेण्याची सूचना केली. 

धरणात पाणी साठा कमी असल्याने भविष्यात नगरकरांवर पाणी कपातीचे संकट समोर उभे आहे. पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थिती असताना हजारोलिटर पाणी अक्षरक्षा वाया जाते याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.