शाश्‍वत विकासासाठी गाव पाणी बाबतीत स्वयंपुर्ण होण्याची गरज -माधवराव लामखडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सध्या भीषण दुष्काळाची चाहूल लागली असून, शेतकरी व पशुधन वाचविण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना झाल्या पाहिजेत. शाश्‍वत विकासासाठी गाव पाणी बाबतीत स्वयंपुर्ण होण्याची गरज आहे. यासाठी जलसंधारणाची कामे करून पाण्याचे नियोजन व योग्य वाटप महत्त्वाचे आहे. 

निंबळक मधील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी एमआयडीसी पंम्प हाऊस ते निंबळक या नवीन पाईपलाइनच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांनी दिले. तर या नवीन पाईपलाइनच्या योजनेने भविष्यात गावाला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नगर तालुक्यातील निंबळक येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातंर्गत रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण तसेच क वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत खंडोबा मंदिराच्या संरक्षण भिंत व कमान उभारणी कामाच्या भूमिपूजन प्रसंगी लामखडे बोलत होते. 

Loading...
माजी नायब तहसीलदार बाबुराव कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोसायटी चेअरमन पोपटराव खामकर, उपसरपंच घनश्याम म्हस्के, भाऊसाहेब गायकवाड, बाळासाहेब कोतकर, मारुती कोतकर, मा.सरपंच विलास लामखडे, शाखा अभियंता टी.एच. झावरे, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, अविनाश आळंदीकर, रामदास गायकवाड, राजू रोकडे, भिमराव खेसे, खंडोबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब जाजगे व संचालक मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे लामखडे म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास निधीतून खंडोबा मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम चालू करण्यात आले आहे. पुढच्या टप्प्यात भक्त निवास व सभामंडपाचे काम मार्गी लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांसाठी उत्कृष्ट रस्ते उपलब्ध करून देण्यात येत असून, ग्रामस्थांनी देखील चालू असलेल्या विकास कामाबाबत जागृकतेने कामाच्या दर्जा बाबत लक्ष देण्याचे सांगितले. 

घनश्याम म्हस्के म्हणाले की, मंदिराचे सुशोभीकरण व उत्तम रस्त्याने गावाची शोभा वाढणार आहे. माजी जि.प. सदस्य कालिंदी लामखडे यांच्या कार्यकाळात निंबळक मध्ये विकास कामांना गती मिळाली. तर माधवराव लामखडे यांच्या रुपाने या विकास कामात मोठी भर पडली असल्याचे सांगून, लोकवर्गणीतून भव्य खंडोबा मंदिर उभारणीचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. 

शाखा अभियंता टी.एच. झावरे यांनी गावात सुरु करण्यात येणार्‍या विविध विकास कामांची माहिती दिली. बाबुराव कोतकर यांनी गावाच्या विकासासाठी तन-मन-धनाने योगदान देण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गेरंगे यांनी केले. आभार भाऊराव गायकवाड यांनी मानले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.