मनसे कामगार सेनेची सहा. कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- समान काम, समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.


या आंदोलनात कामगार सेनेचे चिटणीस चंद्रकांत ढवळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, नितीन भुतारे, अभिषेक मोरे, रतन पाडळकर, बाळासाहेब ढवळे, गणेश शिंदे, अविनाश क्षेत्रे, संकेत सोमवंशी, रुपेश हराळे, गणेश बेलेकर, दिनेश भालेराव, ऋषिकेश वाघमारे, अभिनव गायकवाड, परेश पुरोहित, महेश सुरसे आदी सहभागी झाले होते.
Loading...
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दि.26 सप्टेंबर 2018 रोजी कंत्राटी कर्मचार्‍यांना नोकरीत कायम असणार्‍या कामगारांप्रमाणे समान वेतन मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उत्पादन प्रक्रियेत कार्यरत आहेत.

सद्यस्थितीत उत्पादन प्रक्रियेत काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना आवश्यक तो मोबदला व किमान वेतन मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे हजारो कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे. वाढत्या महागाईमुळे कंत्राटी कामगारांचे जीवन सुसह्य होण्यासाठी हा निर्णय क्रांतीकारक ठरणार आहे.

नगरच्या एमआयडीसीत अनेक कंपन्यांमध्ये हजारो कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे काम करत आहे. त्यांना नियमित कामगारांप्रमाणे लाभ मिळत नसून, त्यांना वेठबिगारी सारखे राबविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तातडीने समान काम, समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास दि.1 सप्टेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.