२४ ऑक्टोबरपासून सुरू होणार शिवस्मारकाचं काम !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील महाराजांच्या पुतळ्याच काम २४ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. एल अॅण्ड टी कंपनीला शिवस्मारकाचं कंत्राट देण्यात आल्याची माहीती समोर येतेयं. शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येतंय. शिवरायांच्या स्मारकाची उंची २१२ मीटर असून अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच स्मारक असणार आहे.
Loading...

उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांवरून छत्रपतींच्या स्मारकाची उंची पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पुतळ्याची उंची 44 मीटरने कमी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीतील स्मारकाच्या सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे.

  • पूर्वी पुतळ्याची उंची 160 मीटर होती, ती आता 126 मीटर करण्यात आली आहे

  • पूर्वी चौथाऱ्याची उंची 30 मीटर होती, ती आता 84 मीटर करण्यात आली आहे. 

  • पूर्वी स्मारकाची एकूण उंची 190 मीटर होती ती आता 210 मीटर करण्यात आली आहे

  • विधानसभेत पुतळ्याच्या उंचीवरून गोंधळ झाला होता. 
  • या स्मारकाच्या कामासाठी समुद्रात दोन टप्प्यात भराव करण्यात येणार आहे
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.