नगरकरांची सांकृतिक भूक भागविण्याचे काम किरण काळेंनी केले – प्रशांत गडाख पाटील


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरात सातत्याने नवनवीन सांस्कृतिक उपक्रम प्रामाणिकपणे आणि सचोटीने राब्निव्यासाठी थिंक ग्लोबल फौंडेशन काम करत असते. फौंडेशनच्या माध्यमातून नगरकर रसिकांची सांकृतिक भूक भागविण्याचे काम किरण काळे करत असतात, असे गौरवोद्गार यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख पाटील यांनी काढले.

निमित्त होते फौंडेशनच्यावतीने आयोजित ‘सिंफनी’ या आगळ्या-वेगळ्या मैफिलीचे. सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले व लेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या ‘सिंफनी’ या पुस्तकावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन माऊली सभागृहात करण्यात आले होतो. पाश्चिमात्य संगीतकारांनी केलेले काम, त्यांचा जीवन प्रवास, त्यांच्या मूळ इंग्रजी गाण्याने प्रभावित होऊन भारतीय संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय हिंदी गाण्यांची दृकश्राव्य मैफिल या वेळी पार पडली.
Loading...

यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले की, किरण काळे हे एक अवलिया तरुण व्यक्तिमत्व आहे. नगरकरांना सांगीतिक-साहित्यिकदृष्ट्या कायम सर्वोत्तम व नाविन्यपूर्ण देण्याचा त्यांचा सतत असणारा प्रयत्न वाखाणण्या जोगा आहे. इंटरनेट आणि टीव्हीमुळे लोकांना घर बसल्या अनेक कार्यक्रम पाहता येत असले तरी रसिकांनी एकत्र येऊन अशा मैफिलींचा घेतलेला आस्वाद निश्चितच अधिक आनंद देणारा आहे.

या वेळी गोडबोले–देशमुख यांनी जगविख्यात पाश्चिमात्य संगीतकारांचा जीवन प्रवास रसिकांसमोर उलगडला. त्यांच्या आयुष्यातील आणि संगीत निर्मितीतील रंजक किस्स्यांना रसिकांनी यावेळी मनमोकळी दाद दिली.

बिटेल्सच्या मूळ गाण्यावरून घेतेलेले झुक गया आसमा चित्रपटातील कौन है जो सपनों में आया, अमेरिकन लोक संगीतावरून घेतलेल्या सीआयडी मधील ये है बम्बई मेरी जान, ज्युलिअस रोसाच्या मूळ गाण्यावरून घेतलेले झुमरू मधील थंडी हवा ये चांदणी सुहानी, पर्शियन संगीतावरून घेतलेल्या सायोनारा – सायोनारा, समाधी मधील गोरे गोरे ओ बाके छोरे, उम खालथोउम या संगीतकाराच्या मूळ गाण्यावरून घेतेलेले आवारा मधील घर आय मेरा परदेसी, लगे राहो मुन्ना भाई मधील पल पल पल, येस बॉस मधील सुनिये तो अशा विविध गाण्यांनी ही मैफिल रंगली होती.

यावेळी जगप्रसिद्ध असणाऱ्या बाख, बीथोवन, मोत्झार्ट, वॅग्नर, चेकॉव्ह्स्की या संगीतकारांच्या मूळ सिंफनी आणि संगीतरचना रसिकांना ऐकायला मिळाल्या. त्यानंतर त्यांच्या रचनांवरून प्रभावित होवून शंकर जयकिशन, राजेश रोशन, ओ.पी.नय्यर, आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या भारतीय संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी आ.संग्राम जगताप, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव काळे, जेष्ठ नागरिक मंचाचे जिल्हाध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर,स्वानंदी हास्य क्लबच्या छाया बंडगर, सुप्रभात ग्रुपचे अध्यक्ष रमेश पळसे,अविनाश मुंडके,प्रकाश बोरुडे,जेष्ठ नागरिक मंचाच्या पुष्पाताई चितांबर, गायक बाळासाहेब वाईकर, सतीश आचार्य, प्रकाश शिंदे,पवन नाईक, सरगमचे अध्यक्ष राम शिंदे,एलआयसीचे शाखाधिकारी नवनाथ आहेर,विलास गंगाखेडकर, नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या अधिकारी नलिनी गुर्रम,विकास अधिकारी श्री. बोळे,चित्रपट निर्माते श्रीपाद दगडे, फौंडेशनचे उपाध्यक्ष संजय पाठक, सचिव सागर काळे, स्वप्निल पाठक, आदित्य काळे, निशिकांत महाजन आदी उपस्थित होते. यावेळी नगरकरांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.

प्रास्ताविक फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी केले. सूत्रसंचलन वीणा दिघे यांनी केले. संगणक अभियंता अपूर्व देशमुख यांनी दृक-श्राव्य मैफिलीची तांत्रिक बाजू सांभाळली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.