मनपा निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर महापालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना अंतिम झाली असल्याने आता या रचनेनुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले आहेत. 


या याद्यांवरील हरकती व सूचनांचा विचार करून ६ नोव्हेंबरला प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या तयार होणार आहेत. मनपाच्या ३४ प्रभागांचे १७ प्रभाग झाले असून, यासाठीच्या प्रारुप प्रभाग रचनेचे व त्यावरील हरकतींच्या सुनावणीचे काम होऊन १ ऑक्टोबरला ही रचना अंतिम झाली आहे. 
Loading...

आता या रचनेनुसार संबंधित प्रभागासाठीच्या स्वतंत्र मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी १ सप्टेंबर २०१८ रोजीची नगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी विचारात घेतली जाणार आहे. या यादीतील मतदारांची नावे त्यांच्याशी संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट करून अशा प्रभाग निहाय १७ प्रारुप मतदार याद्या येत्या २५ ऑक्टोबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

त्यानंतर या याद्यांवर ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. त्यांचा विचार करून आवश्यक बदल केल्यानंतर ६ नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.