श्रीगोंद्यात भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आरोपींना भेटण्यास मज्जाव केल्याचा राग येऊन लॉकअप गार्डच्या ड्युटीवर असलेले श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रेवनाथ कारभारी दहिफळे यांना भाजप कार्यकर्ता सुधीर लक्ष्मण नलगे आणि त्याच्या सहकाऱ्याने पोलिसाला बेदम मारहाण करत जखमी केले. श्रीगोंदा येथे वाळूतस्करांनी दहशत निर्माण केली आहे.
Loading...

सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. न्यायालयात नेलेल्या आरोपींना पुन्हा नेत असताना नलगे हे कारागृहात आले. आरोपींना भेटण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारा, असे सांगितल्याचा राग आल्याने नलगे यांनी कॉन्स्टेबल दहिफळे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मला ओळखले नाही का, असे म्हणत नलगे यांनी शिवीगाळ केली. 

बाहेर उभा असलेल्या साथीदाराला बोलावत दोघांनी दहिफळे यांची गचांडी पकडली. उजवा हात धरून तोंडावर मारण्यास सुरुवात केली. पोलिस कर्मचारी आर. बी. झुंजार, प्रताप देवकाते, कोपनर यांनी दहिफळे यांना सोडवले. नंतर सुधीर नलगे पळून गेला. पोलिसांनी त्याचा साथीदार आशिष नलगे याला पकडले. कॉन्स्टेबल रेवणनाथ दहिफळे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.