भाजपाच्या वेबसाईटवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप गोवा युनिटची एक जुनी वेबसाईट सोमवारी अज्ञात लोकांनी हॅक केली आहे, आणि त्यावर पाकिस्तान जिंदाबाद असा संदेश लिहिला आहे. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांने ही माहिती दिली आहे. वेबसाईट हॅक झाल्यानंतर त्यावर टीम पीसीई आणि मोहम्मद बिलाल असेही नावं लिहण्यात आली आहेत. 

Loading...
टीम पीसीई ही शक्यतो सायबर हल्ला करणाऱ्या टीमचे नाव असू शकते.हॅकरने वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर एक संदेशात ‘mailto:catch.if.you.can@hotmail.com’. अशी एक लिंक सुध्दा सोडली आहे.

ही एक जुनी वेबसाईट होती. नव्या वेबसाईटला हॅकीग विरोधी सुरक्षा व उपाययोजन करण्यात आल्या आहेत’. तसेच पदाधिकाऱ्यांने असे म्हटले आहे की, ‘भाजपने आपल्या प्रदेश युनिटच्या कार्यकर्त्यांना नवन वेबसाइटशी जोडले आहे. त्यामुळे या सायबर हल्ल्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.