पाथर्डीतील करंजी घाटात खोल दरीमध्ये आढळला बेवारस मृतदेह.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये रस्त्याच्याकडेला एका खोल दरीमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास एका बेवारस पुरूषाचा मृतदेह आढळला. यामुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडाली असून, मोहटा देवीला पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
Loading...

रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाथर्डी पोलीस स्टेशनला मोबाईलद्वारे करंजी घाटात रस्त्याच्या कडेला एका दरीमध्ये पुरूषाचा मृतदेह पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे यांच्यासह हवालदार लक्ष्मण राख,सतीष खोमणे महामार्ग विभागाचे गोल्हार यांनी घटनास्थळी येवून मृतदेह दरीतून वरती काढला. 

मयत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ वर्ष असून तो अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने हा काही घातपाताचा प्रकार आहे का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत. रात्रभर भाविक या रस्त्याने पायी प्रवास करत असताना या व्यक्तीचा या ठिकाणी मृतदेह कसा आणि कुठून आला याची मोठी चर्चा सुरू झाली असून, यामुळे देवीला पायी जाणाऱ्या भाविक भक्तांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.