दुष्काळात कोणीही राजकारण आणू नये आ.बाळासाहेब थोरातांचे आवाहन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हे वर्ष आपल्या सर्वांसाठी अतिशय कठीण आहे. सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी चांगले काम करणे गरजेचे आहे. दुष्काळामध्ये कोणी राजकारण आणू नये असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर येथील प्रांत कार्यालयाच्या सभागृहात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. 

Loading...
आ.थोरात म्हणाले की, तालुक्यात १७१ गावे व २४० वाड्यावस्त्या आहे. त्यापैकी १६ गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. कमी पावसामुळे काही भागात पाणी टंचाई होत आहे. मागणी व प्रस्तावानंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन द्यावेत. दुष्काळ निवारण कामात प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शासकीय मंजुऱ्या, तांत्रिक कारणे सांगून पाण्याचे टँकर थांबता कामा नये. 

सगळ्यात पहिली जबाबदारी म्हणजे टंचाईग्रस्त गावांना पाणी पोहचविले पाहिजे. टँकर मागणीनंतर तिसऱ्याच दिवशी टँकर पोहचला पाहिजे. राज्य शासन व जिल्हाधिकारी पातळीवर आम्ही मदत करु. पाण्याचे स्त्रोत आरक्षित केले पाहिजे. 

तालुक्यातील वाडीवस्तींवरही पाणी पोहचविण्याची व्यवस्था करा. कुठेही साठवणुकीच्या पाण्याचा पुरवठा करु नका. ज्या गावात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे अशा गावांनी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावेत. अधिकारी व तलाठयांनी गावोगावी जाऊन टंचाईचा आढावा घ्यावा.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.