नगर सोलापूर महामार्गावर ट्रक आणि बसच्या अपघातात एकाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अहमदनगर सोलापूर महामार्गावर मिरजगावजवळ ट्रक व खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले. तर ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. 
Loading...

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजगावजवळ कोकणगाव शिवारात शिर्डीकडे येणारी खासगी प्रवाशी बस क्र.एमएच १५एके.३१३ व सोलापूरकडे जाणारा केए.३९ ४०२५ या क्रमांकाच्या ट्रकची व या बसची धडक झाली.अपघात ग्रस्त बसमधील ९ प्रवाशी जखमी झाले आहेत असून ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.