महिलेच्या विनयभंगप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यात एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही महिला व तिचा दीर हे गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोटारसायकलीवरुन दवाखान्यात जात असताना त्यांची गाडी आडवी लावून 'माझ्या गाडीला कट का मारला' या मागील भांडणाच्या कारणावरुन महिलेचा विनयभंग केला व तिच्या दिरास लोखंडी गज व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुनशाकीर मोहमंद शेख, मोहमंद आमीन शेख, नासिर मोहमंद शेख, नाजिम मोहमंद शेख, नादीर उर्फ बबु मोहमंद शेख, जुबेर बंडु शेख (सर्व रा.कुरण) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.