कळसूबाई शिखरावर पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील कळसुबाईच्या शिखरावर भिकाजी शंकर झनकर या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. नवरात्रीच्या कालावधी मध्ये कळसुबाई शिखरावर  अशा प्रकारे अंत झाल्याने अनेक भाविकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Loading...
भिकाजी झनकर (वय ४८) हे भरवीर (ता. इगतपुरी) येथील असून ते सध्या गंगापूर (ता. नाशिक) पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल सात वाजता नाशिकवरुन बारी या गावी कळसुबाई मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत दोन मुले, एक मुलगी आणि नातेवाईक असा परिवार होता. 

संपूर्ण गड व्यवस्थित चढल्यानंतर गडावर आईच्या मंदिराजवळच दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी राजूर येथील केतन शहा व त्यांचे मित्र तसेच राजूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी डगळे यांनी त्यांना डोली करून थेट गडावरुन खाली आणत तात्काळ राजुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकिय अधिकारी त्यांचा मृत्यू झाल्याचे यांनी सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.