मोनिकाताई राजळे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून स्व. राजीव राजळे यांची महाराष्ट्राला ओळख होती. गोरगरीब, दीनदलितांचे प्रश्‍न संसदेत पोटतिडकीने मांडणारा संसदपटू हा किताब त्यांना मिळाला होता. त्यांच्या स्मरणार्थ सर्वसामान्य नागरिकांची गरज ओळखून आमदार मोनिका राजळे यांनी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करीत स्व. राजळे यांना अभिप्रेत असणारे कार्य सुरू ठेवले आहे, असे गौरवोद्‌गार पालकमंत्री राम शिंदे यांनी काढले.
Loading...

आ. कर्डिले आपल्या भाषणात म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजाताई मुंडे मला तर निधी देतातच परंतु आ .राजळे यांना जास्तीचा निधी देतात. मला वाटत होते माझा जनसंपर्क जास्त आहे. परंतु येथे आल्यावर कळाले विकास कामांच्या माध्यमातून माझ्यापेक्षाही जास्त संपर्क आ.राजळे यांचा आहे. पुढील वेळेला राजळे आमदार तर होतीलच परंतु कॅबिनेट मंत्रीपदीही त्यांची वर्णी लागेल.

या कर्डिले यांच्या वक्तव्याचा धागा पकडून पालकमंत्री शिंदे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले कर्डिले साहेब तुमची परवानगी असल्यामुळे राजळे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मोनिकाताई मंत्री झाल्या तर मला काहीच अडचण नाही. यावर व्यासपीठावर बसलेले कर्डिले म्हणाले.

मागील सरकारमध्ये जिल्ह्यात तीन मंत्री होते. त्यामुळे आ.राजळे यांना मंत्री करा व तुम्हीही मंत्री रहा आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू. यावर राम शिंदे म्हणाले पूर्वीच्या सरकारमध्ये तीन मंत्री होते हे जरी खरे असले तरी आता मात्र मी एकटाच पुरेसा आहे असे वरिष्ठांना वाटते. मंत्रिपदाच्या विषयावरून व्यासपीठावर कर्डिले- शिंदे यांच्यात रंगलेल्या शाब्दिक कलगीतुऱ्याने चांगलाच हास्यकल्लोळ उडाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.