येत्या दिवाळीत भाजप-सेना सरकार गोरगरिबांना डाएट लाडू खाऊ घालणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- येत्या दिवाळीत भाजप-शिवसेना सरकार गोरगरिबांना बहुतेक डाएट लाडू खाऊ घालणार असंच दिसतंय. कारण दिवाळीनिमित्त बीपीएल रेशनकार्ड धारकांना फक्त 1 किलो साखर आणि 2 किलो हरभरा डाळ मिळणार आहे. 
Loading...

राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीच याबद्दल घोषणा केलीये. दिवाळी निमित्त कार्डधारकांना प्रति कुटुंब एक किलो साखर दिली जाणार आहे. ही साखर वाटप फक्त दिवाळीत दिली जाणार असल्याचं गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. 


साखरेसोबत २ किलो हरभरा डाळही दिली जाणार असल्याचं बापट यांनी सांगितलं. राज्यात स्वस्त दुकानातून साखर वाटप बंद होते. आता दिवाळीनिमित्ताने 1 किलो साखर आणि 2 किलो हरभरा डाळ मिळणार आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.