दांडिया नाईटमध्ये थिरकल्या महिलांसह युवती


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या दांडियाचा आनंद महिला व युवतींना लुटण्यासाठी शहरात दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. जल्लोषमय वातावरणात हॉटेल संजोग येथे झालेल्या या दांडिया नाईटमध्ये महिला व युवती दांडियाच्या तालावर थिरकल्या. 

स्वप्नाली जंबे व लविता नवलानी यांनी खास महिला व कुटुंबीयांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.किरण दिपक, डॉ.वैशाली किरण, आर.के. इंटेरिअर्सचे डॉ.नितिन कुंकुलोळ, डॉ.अरुण इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या दांडिया नाईट कार्यक्रमास महिलांसह युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. विविध पारंपारिक वेशभुषा परिधान करुन युवती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट जोडी व पारंपारिक वेशभुषा परिधान केलेल्यांना बक्षिसे देण्यात आली. डॉ.सुजय विखे यांनी देखील दांडियाचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. 

तर रॅम्पवॉकने कार्यक्रमाचा उत्साह वाढला होता. या कार्यक्रमासाठी आर.के. इंटेरियर्स यांचे प्रायोजकत्व लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिध्दी पांचाळ, हर्षद शेळके, राम पठारे, आकाश मुनफन, प्रशांत मुनफन, संकेत पुजारी, अभिजीत शिर्के, स्वाती अट्टल, फरिद सय्यद, अफरोज शेख, कुणाल दोधेजा आदींनी परिश्रम घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.