भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अएसोच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनेचे धडे देण्यात आले. 

शाळेचे मुख्यध्यापक उल्हास दुगड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. दुगड म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे. काही आपत्ती ओढविल्यास विद्यार्थी सक्षमपणे त्याच्यावर मात करु शकणार असून, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

क्रीडा शिक्षक रावसाहेब बाबर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारे लागलेली आग विझविण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र व उद्भवलेल्या आपत्तीचा सामना कशा पध्दतीने करावा? याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.