रासदांडिया उपक्रमात उपस्थित मान्यवरांनीही घेतला दांडिया व नृत्याचा आनंद


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सतत एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या खूपच कमी संस्था आहे. त्यातील एक निरंजन सेवाभावी संस्थेने आपल्या कार्याने वेगळा ठसा निर्माण केला आहे .सातत्याने दिव्यांग व विशेष मुलांसाठी हुरडा पार्टी ,पतंग उत्सव,आंबे खाण्याची स्पर्धा व रास दांडिया सारखे उपक्रम राबवून पालकत्वाची भूमिका पार पाडली आहे.आज या मुलांचा आनंद व उत्साह पाहता निरंजन सेवा भावी संस्थेने दिव्यांगासाठी राबविलेल्या विविध उपक्रमातून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला असल्याचे मत नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे लक्ष्मी फँशनचे शैलेश गांधी यांच्या सहकार्याने दिव्यांग व विशेष मुलांनसाठी अक्षता गार्डन येथे आयोजित रासदांडिया उपक्रमाचा शुभारंभ देवी पूजन व दीप प्रज्वलनाने उद्योजक श्री.नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मोहनलाल मानधना,नंदलाल मनियार,मर्चंट बेंक संचालक आदेश चंगेडीया,कमलेश भंडारी,अमित मुथा,शिवाजी कदम, शैलेश गांधी ,डॉ.भंडारी,जितेंद्र बिहाणी,धनेश कोठारी,किशोर बोरा,अमित काबरा, अतुल डागा कार्याध्यक्ष मुकुंद धूत,सचिव सुमित चांडक,मनिष सोमाणी व मान्यवर उपस्थित होते.

शैलेश गांधी म्हणाले कि देवाचे दूत म्हणून निरंजन सेवा भावी संस्थचे कार्य असून अशा कार्यात सहभागी होण्याचे भाग्य सतत लाभावे हीच आपेक्षा राहील.यावेळी मोहनलाल मानधना व आदेश चंगेडीया यांनी मनोगत व्यक्त केले.नगरमधील सावली,उत्कर्ष बालघर,स्नेहालय,अनापप्रेम,महात्मा फुले वसतिगृह,आकांक्षा रिहँबिलीटेशन सेंटर अशा विविध संस्था मधील ३००दिव्यांगानी रास दांडीयात सहभाग घेतला होता .उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्यासर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.दांडिया नंतर मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.