राधा-कृष्ण मंदिरात माता की चौकी कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. माता की चौकी कार्यक्रमात बबलू दुग्गल यांनी देवीचे एकाहून एक सरस भक्तीगीते सादर केली. वाद्यांसह भक्तीगीतांवर बहरलेल्या कार्यक्रमाचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी शीख, पंजाबी व सिंधी समाजाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रात्री रंगलेल्या माता की चौकीमध्ये भाविकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. सिरत धुप्पड या लहान बालिकेने वैष्णव देवीचे रुप धारण करुन उपस्थितांना दर्शन देताच भाविकांनी देवीचा जयजयकार केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन धुप्पड व राकेश गुप्ता यांच्या हस्ते देवीची आरती झाली. 

यावेळी पंडित महेंद्र शर्मा, अनिल सबलोक, राजेंद्र कंत्रोड, विनोद दिवाण, किशोर कंत्रोड, प्रदिप पंजाबी, अजय पंजाबी, दामू बठेजा, महेश मध्यान, रोनक धुप्पड, बिशनदास चड्डा, योगेश धुप्पड, डॉ.टेकवाणी, अशोक धुप्पड, यश धुप्पड, विजय पंजाबी, सुनिल ओबेरॉय, सुभाष जग्गी, मुन्ना जग्गी, हितेश ओबरॉय आदी उपस्थित होते. भंडार्‍याने कार्यक्रमाची सांगता झाली. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व गाभार्याभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.