नगर शहरात लवकरच राज ठाकरे यांची सभा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनपा निवडणुकीत संपूर्ण ताकतीने लढवणार असून, कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवारांना निवडून आनण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी केले. मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी मनसेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राशिनकर बोलत होते. 

Loading...
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकी प्रसंगी मनसेचे नेते मनोज राऊत, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, शहराध्यक्ष परेश पुरोहित, कामगार सेनेचे चिटणीस चंद्रकांत ढवळे, अभिषेक मोरे, अभिनय गायकवाड, संजय चांदणे, अशोक दातरंगे, महेश सुरसे, तुषार हिरवे, निलेश खांडरे, पोपट पाथरे आदींसह शहरातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राशिनकर म्हणाले की, मनसेने शहरात कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे काम केले आहे. मागील बारा वर्षांपासून सातत्याने शहरातील छोट्या मोठ्या प्रश्‍नांना बेधडकपणे समोर जाऊन ते सोडविण्याचे काम करण्यात आले. मनसेने केलेल्या कामांमुळे शहरातील प्रस्थापितांना धडकी भरली आहे. पैश्याने निवडणूका जिंकण्यापेक्षा नागरिकांचे कामे करुन विकासाच्या मुद्दयावर मनसे निवडून येणार आहे. 

मागील निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर चार नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यांनी पक्षापेक्षा स्वहित पाहिला. त्यामुळे पक्ष वाढीस मागील काही काळात मरगळ आली होती. मनसेचे दोन नगरसेवक इतर पक्षात गेले असून, उर्वरित दोन इतर पक्षांच्या संपर्कात आहे. यासाठी मनसेच्या विद्यमान नगरसेवकांना तिकीट न देता जनतेच्या प्रश्‍नाशी बांधिलकी ठेवून काम करणार्‍यांना नगरसेवकपदी निवडून आनण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले की, मनसेची स्थापना फक्त निवडणुका लढवण्यासाठी झाली नसून, जनतेच्या सेवेसाठी करण्यात आली आहे. पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम चालू आहे. मनसेची चेष्टा करणारेसुद्धा मनसेत दाखल झाले. 

शहराच्या विकासासाठी नगरकरांना मनसे हा एक उत्तम पर्याय ठरू शकणार आहे. शहरातील प्रस्थापित व घराणेशाहीला शह देण्यासाठी मनसे मैदानात उतरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच लवकरच मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शहरात राज ठाकरे यांची सभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.