प्रा.राम शिंदे व माजी मंत्री बबनराव पाचपुते केवळ शोभेचे पालकमंत्री राहिले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या २१ अॉक्टोबरला नगर येथे होणाऱ्या जाहीर सभेत आगामी लोकसभा निवडणुकीचे जिल्ह्यातील उमेदवार जाहीर होणार आहेत, असे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवसैनिकांच्या बैठकीत सांगितले. 
Loading...

जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार, शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, आमदार विजय औटी यांच्यापैकी एकाची लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषणा केली जाणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. 


गाडे म्हणाले, ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेलार म्हणाले, मंत्री राम शिंदे व माजी मंत्री बबनराव पाचपुते केवळ शोभेचे पालकमंत्रिपद राहिले. जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान काहीच नाही. मिळालेल्या संधीचे त्यांना सोने करता आले नाही. 


पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याचे भासवतात, पण त्याचा फायदा जिल्ह्यासाठी केला नाही. कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक प्रश्न का सुटत नाहीत ही चिंतेची बाब आहे. तालुकाप्रमुख भोसले यांनी ठाकरे यांच्या सभेला तालुक्यातील पाच हजार शिवसैनिक उपस्थित राहतील अशी ग्वाही दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.