मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचा अपघाती मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्री क्षेत्र मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील महिला भाविकाचा करोडी गावाजवळील धोकादायक वळणावर अपघाती मृत्यू झाला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली . सविता दिलीप देवकते (रा. वासनवाडी ता. जि. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे.

Loading...
देवकाते या आपल्या पतीसमवेत मोटार सायकलवर श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर दर्शनासाठी येत होत्या. करोडी जवळील धोकादायक वळणावर मोटारसायकल व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक होऊन देवकते यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती गंभीर जखमी आहेत. अपघात झाल्यानंतर बोलेरो चालकाने गाडी घटनास्थळापासून पळवून नेल्याची प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.