जे उत्तरेत होते, ते दक्षिणेत का होत नाही - सुजय विखे पाटील


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 'निवडून गेलेले लोकप्रतिनिधी पुन्हा सामान्य माणसाच्या समस्यांकडे पाहातही नाही. ही दक्षिणेतील परिस्थिती बदलायची असेल तर सुशिक्षित आणि विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवाराचा आग्रह जनतेने धरला पाहिजे. 


Loading...
ही परिस्थिती बदलणे तुमच्या हातात आहे. तुमचे प्रश्न सोडविणारा, विकासाची दृष्टी असलेला चांगला उमेदवार पाहिजे असेल तर जनतेनेच आता राजकीय पक्षांवर दबाव आणण्याची गरज आहे,' असे मत डॉ. विखे यांनी व्यक्त केली. 

पारनेर तालुक्यातील विविध गटातील विकास कामांचा प्रारंभ डॉ. विखे यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी लोकसभा निवडणुकीतील भूमिकेवर भाष्य केले. या कार्यक्रमात पारनेरचे आमदार विजय औटी व नगरचे खासदार दिलीप गांधी यांची नावे न घेता त्यांच्या कारभारावर टीका मात्र त्यांनी केली. 


शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकास प्रक्रियेचा आढावा जाणीवपूर्वक मांडून, 'जे उत्तरेत होते, ते दक्षिणेत का होत नाही, पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून पाठविता मग प्रश्न का सुटत नाहीत,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.