आई वडीलांचा सांभाळ न करता छळ करणाऱ्या मुलांविरूद्ध पोलिसांत तक्रार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उतारवयात सांभाळ न करणाऱ्या, मानसिक, शारीरिक छळ करणाऱ्या मुलांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पालक आता पोलिस स्टेशनला येऊ लागले आहेत. नगरमध्ये तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला अशा प्रकारचे दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 
Loading...

कस्तुरी किसन गायकवाड (वय ६४) यांच्या फिर्यादीवरून मुलगा विश्वभूषणविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. मागील दोन वर्षांपासून लहान मुलगा विश्वभूषण हा माझी काळजी घेत नाही. घरात राहू देत नाही. घरात राहण्यास गेल्यास लाथाबुक्कांनी मारहाण करतो. 


दमदाटी करतो, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मुलाविरुद्ध आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २०१७चे कलम, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


दुसरा एक गुन्हा भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आला आहे. निमा सिंग (५८. रा. सदरबाजार भिंगार) यांच्या फिर्यादीवरून मुलगा विवेक व सून कोमल हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रेशनकार्ड घराबाहेर का फेकले याचा राग येऊन सुनेने मारहाण केली. 


जेवणात विष घालून मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर मुलाने दारू पिऊन मला व पतीला मारहाण केली. मुलगा व सून दोघे शारीरिक व मानसिक त्रास देतात. सांभाळण्याची व पालन पोषण करण्याची कोणतीही जबादारी घेत नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.