गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती तीव्र चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या शुक्रवारपासून पर्रिकर हे दिल्लीच्या AIMS रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. गेले काही महिने ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. पर्रिकर यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Loading...

AIMS च्या अॅम्ब्युलन्समधून पर्रिकर गोव्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांची प्रकृतीची वेळोवेळी काळजी घेण्यासाठी AIMS च्या डॉक्टरांचं पथक पर्रिकरांसोबत गोव्याला रवाना करण्यात आलं आहे.दरम्यान, मार्च महिन्यातही 62 वर्षांच्या मनोहर पर्रिकरांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले. 


त्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते आणि पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेला जावं लागलं होतं. या वाढत्या आजारपणामुळे मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा पर्रिकरांनी व्यक्त केली.काही काळासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा पर्रिकरांनी व्यक्त केली होती.  

परत येईपर्यंत मुख्यमंत्रिपदाची सूत्र दुसऱ्याच्या हाती सोपवण्याची इच्छा त्यांनी अमित शहांकडे व्यक्त व्यक्त केली होती.पण मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री कायम राहतील असा निर्णय अमित शहा यांनी जाहीर केला.त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं एम्सच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.