शिर्डीत डॉक्टरकडून बदनामीची धमकी देत आरोग्य सेविकेवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्राथमिक आरोग्य केंद्रात सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणीवर वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव लक्ष्मण फड (वय ३५, रा. अरबुजवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) याने व्ही.डी.ओ. क्लिप सोशल मिडियावर टाकून बदनामी करीन, अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केले. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading...
याबाबत अधिक माहिती अशी, आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची ओळख डॉ. महादेव लक्ष्मण फड याच्या बरोबर झाली. फड याने ओळखीचा गैरफायदा घेत जून २०१७ पासून तरुणीवर वेळोवेळी गंगाखेड तालुक्यातील मन्नानाथनगर, गंगाखेड (जि. परभणी) तसेच शिर्डी शहरात वेळोवेळी अत्याचार केले. 

तसेच शिर्डीमध्ये १२ ऑक्टोबर रोजी साडेअकरा व १३ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच्चया सुमारास आरोपीने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने शिर्डी पोलिसांत दाखल केली आहे. शिर्डी पोलिसांनी डॉ. फड याला अटक केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.