कोपरगाव बाजार समितीत डाळिंब @२१०० रुपये.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव बाजार समितीत शुक्रवारी (दि.१२) झालेल्‍या डाळींब लिलावात डाळींब २ हजार १०० या भावाने विकले गेले. तर बाजरी, हरबरा, सोयाबीन, मका मुग या भुसार मालाची आवक सुरू झाली असल्‍याची माहिती अशी माहिती सभापती संभाजी रक्‍ताटे यांनी दिली. बाजार समितीत सोमवार, बुधवार व शुक्रवार डाळींब लिलावाचे वार असल्‍याने शुक्रवारी १ हजार १५७ कॅरेट डाळींबाची आवक झाली. 

Loading...
नंबर एक डाळींब- १००० ते २१००, दोन नं.-७५० ते ९७५ , तीन नं.- १०० ते ७२५ रूपयांनी विकला गेला. तर बाजरी आवक क्विंटल ५ ( कमाल १४०० व किमान ११७५ सर्वसाधारण १३२५) , हरभरा आवक क्विंटल ६९ ( कमाल ३८४० व किमान ३५०० सर्वसाधारण ३७४० ) , सोयाबीन आवक क्विंटल ८६२ (कमाल ३०४५ व किमान ३००१ सर्वसाधारण ३०२१), मका आवक क्विंटल ५ (कमाल १४०१ व किमान १४०१ सर्वसाधारण १४०१), मुग आवक क्विंटल १३ (कमाल ५००२ व किमान ४७५० सर्वसाधारण ४९०१).
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.