त्या' मुलीचा मृत्यू ब्रेन ट्युमरने !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कावेरी ताठे या मुलीचा मृत्यू हा डेंग्यू सदृश आजाराने झालेला नसून ब्रेन ट्युमर आजाराने झाला आले, अशी माहिती टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बापूसाहेब चाबुकस्वार व डॉ. उन्मेश लोंढे यांनी दिली. 

Loading...
याबाबत डॉ. लोंढे यांनी विळदघाट येथील रूग्णालयातील डॉक्टरांकडून या मुलीच्या आजाराविषयी माहिती घेतली असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की, या मुलीचा मृत्यू ब्रेन ट्यूमर या आजाराने झालेला आहे. या मुलीचा एमआरआय केला तेव्हा मेंदूत दोन गाठी दिसून आल्या त्यामुळे या रूग्णाला पुण्यास नेण्याचा सल्ला आम्ही दिला होता, अशी माहिती येथील डॉक्टरांनी डॉ. लोंढे यांना दिली. 

टाकळीभान येथील कावेरी मोहन ताठे (वय १२) या सहावीत शिकणा‍ऱ्या मुलीचा मृत्यू डेंग्यू सदृश आजाराने झाला आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे. मयत कावेरी हीला ताप आल्याने तिला येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी तिला उपचारासाठी श्रीरामपूर येथे पाठविले. 

या डॉक्टरांनी तपासणी करून लोणी येथील प्रवरा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. ताठे यांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांनी मुलीला विळदघाट येथील प्रवरा रूग्णालयात दाखल केले. तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर येथील डॉक्टरांनी मुलीला पुणे येथे उपचारास नेण्याचा सल्ला दिल्यावर या कुटुंबाकडे पैसे नसल्याने त्यांनी मुलीला सिव्हिल रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी रूग्णाची तपासणी केली असता मुलगी मृत झाल्याचे घोषित केले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.