आ.अरुण जगतापांचे नाव येताच डॉ.सुजय विखे दक्षिणेत सक्रीय !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविन्याच्या तयारीत असलेले डॉ. सुजय विखे राष्ट्रवादीकडून आ.अरुण जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच पुन्हा या मतदारसंघात सक्रीय झाले आहे. 

Loading...
आज रविवारी त्यांच्या उपस्थिती पारनेर तालुक्यातील विविध गावांत कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी डॉ. विखे यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नगरच्या दक्षिण भागात सर्वदूर दौरा केला. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांनी घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा झाली. 

नगर शहरात मोठा कार्यक्रम घेऊन विखे यांनी दक्षिणेचा दौरा थांबविला होता. मध्यतंरी बराच काळ त्यांनी उत्तर भागातच कार्यक्रम घेणे पसंत केले. निवडणूक जवळ आल्याने आता मतदारसंघ आदलाबदलीची चर्चा वेगाने सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. 

एवढचे नव्हे तर संभाव्य उमेदवार म्हणून आमदार अरुण जगताप यांचे नावही पुढे केले आहे. काहीही झाले तर निवडणूक लढवायची, असा डॉ. विखे यांचा ठाम निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा दक्षिण भागात सक्रीय होत असल्याचे दिसून येते. 

रविवारी पारनेर तालुक्यातील अपधूप, वाळवणे, रांजणगाव, रांधा, म्हसे गुणोरा, दरोडी, निघोज, देवीभोयरे आदी गावांमध्ये त्यांचे विविध कार्यक्रम आहेत. देवस्थानांना भेटी, विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने, कार्यकर्त्यांच्या बैठका असे कार्यक्रम आहेत. दिवसभर ते तालुक्यात थांबणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.