वाळू तस्करीबद्दल माहिती दिल्यानेच लंके यांच्यावर हल्ला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील नाना पाटील लंके यांच्यावरील जिवघेण्या हल्ल्याबाबत संशयितांकडे चौकशी सुरू आहे. निघोज व परिसरात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लंके यांनी अधिकाऱ्यांना वाळू तस्करीची माहिती दिली म्हणून त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याची चर्चा या परिसरात सध्या सुरू आहे.


Loading...
भाऊबंदकीचा, जमिनीचा वाद की वाळू तस्करीची तक्रार यावर पोलिस तपास सुरू आहे. या हल्ल्यात लंके गंभीर जखमी झाल्याने निघोज व परिसरात घबराट पसरली आहे. पहाटे फिरणाऱ्यांच्या संख्येत घट झाली असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करीत गुन्हेगारांना त्वरित पकडण्याची सुचना केली आहे. 

पोलिस उपअधीक्षक अरूण जगताप यांनी लंके यांच्या घरी जाऊन लंके यांचे ज्येष्ठ चिरंजीव मंगेश लंके यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे शनिवारी लंके यांच्यावरील हल्ल्याबाबत माहिती घेत होते. लंके यांच्या जबाबातून एकाचे नाव आल्याने त्याची चौकशी करण्यात आली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.