श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्यास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा श्रीगोंदा शहरातील बनकर मळा, येथील राहणारा व्यापारी शहानुर शमशोद्दीन आत्तार याला श्रीगोंदा पोलिसांनी हैदराबाद येथून नुकतीच अटक करून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले आहे. 

Loading...
आत्तार याने श्रीगोंदा तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना तुमचा कांदा जास्त भावाने पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून कांदा खरेदी करत त्यांची आर्थिक फसवणूक केली होती.. याबाबत काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्तार याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 

त्यानंतर श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली असता. आत्तार हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना समजली. 

त्यानंतर श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलीस उपनिरीक्षक करनोर, संजय कोतकर अमोल शिंदे यांचे पथक हैदराबाद येथे पाठवून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहानुर आत्तार यास ताब्यात घेतले. श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले असून त्याला अटक करून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली आहे. आत्तार याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.