सत्यजित तांबेंनी सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेस काळा रंग फासून सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी विचार मंचाच्या वतीने करण्यात आली. 


Loading...
सत्यजित मोठ्या पदावर गेल्याने सुधारला असेल पण तसे काही घडले नाही, अशी टीका करून नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीने तांबे यांचा निषेध करण्यात आला आहे.

पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले होते यावेळी आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले होते.सत्यजित तांबेंसह पन्नास जणांवर गुन्हा दाखल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सत्यजित तांबेंसह पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.