लंके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक नानापाटील लंके (६८) यांना शुक्रवारी पहाटे पाच वाजता जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. लंके यांच्या डोळ्यात मिरची टाकून लोखंडी टणक वस्तूने त्यांच्या डोक्यात वार केले. पायावर व हातावर मारण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात दुपारपर्यंत उपचार सुरू होते. 

Loading...
त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. लंके हे निघोज पिंप्री जलसेन रस्त्यानजीक राहतात. ते नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडले व जवळच्या तनपुरे वस्तीजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. 

त्यावेळी लंके ओरडले व जवळपास राहणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. या वेळी हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. गंभीर जखमी झाल्याने लंके यांना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. लंके हे गेली अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय आहेत. 

पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली निघोज पोलिस तपास करीत आहेत. उपनिरीक्षक बोत्रे यांनी शिरूर येथे जाऊन लंके यांचा जबाब घेतला. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.