अल्पवयीन शाळकरी मुलाला अत्याचार करणाऱ्या आरोपीकडून जीवे मारण्याच्या धमक्‍या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्‍यातील मिर्झापूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीकडून जीवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जात आहे. त्यामुळे आरोपीवर कारवाई व्हावी व आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी पिडीत मुलाच्या कुटूंबियांनी पोलिसांकडे केली आहे. 

Loading...
पिडीत 16 वर्षीय मुलावर आरोपी बाजीराव रामनाथ वलवे याने लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोपीवर 27 सप्टेंबरला तालुका पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अद्यापही अटक केली नाही. 

दरम्यान आरोपी व त्याच्या नातलगांनकडून फिर्याद मागे घेण्यास पिडीत मुलाला व त्याच्या कुटुंबावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असून आम्हाला पोलीस संरक्षण देवून, आरोपीस तत्काळ अटक करा असेही निवेदनात म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.