राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का, माजी शहराध्यक्ष भाजपाच्या वाटेवर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजय चितळे व राहुल वाकळे हे दोघे रविवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. अजय चितळे हे आ. संग्राम जगताप यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे चितळे यांचा भाजप प्रवेश आ. जगतापांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पालकमंत्री राम शिंदे व खा. दिलीप गांधी यांच्या हस्ते चितळे व वाकळे यांचा प्रवेश होणार आहे. Loading...
चितळे यांना प्रभाग 13 व वाकळेंना प्रभाग 6 मधून भाजपची उमेदवारी निश्‍चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.डिसेंबर महिन्यात होणार्‍या मनपा निवडणुकीसाठी भाजपने 42 प्लसचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने इनकमिंग सुरू केले आहे. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मनोज दुलम, माजी नगरसेवक विजय बोरूडे यांनी मागील महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. 

शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून निवडणुकीसाठी आ. सुजितसिंह ठाकूर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच कोअर कमिटी देखील करण्यात आली आहे. या कोअर कमिटीत पालकमंत्री राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, ऍड. अभय आगरकर, किशोर बोरा यांचा समावेश आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.